गडचिरोली: रानटी हत्तींचा कळप वडसा तालुक्यात दाखल | Batmi Express

Be
0

wadsa,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,

वडसा
वाघाच्या हल्ल्यांमुळे दहशतीत असलेल्या वडसा (देसाईगंजतालुक्यावर आता रानटी हत्तींच्या रूपाने नवे संकट कोसळले आहे. रानटी हत्तींचा कळप वडसा (देसाईगंजतालुक्यात दाखल झाल्याने वन विभागाकडून आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बरेच दिवस कुरखेडा तालुक्यात मुक्काम ठोकल्यानंतर हा कळप चारा आणि पाण्याच्या शोधात कोरोगाव जवळील रावणवाडी टोली परिसरात दाखल झाला आहे. येथील एका तळ्यात मुक्तपणे जलक्रीडा करताना काही नागरिकांनी त्यांना कॅमेऱ्यात टिपले.

महिनाभरापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने धानोरा, कुरखेडा तालुका होत वडसा (देसाईगंजतालुक्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. कुरखेडा आणि धानोरा तालुक्यात या कळपाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे. सोबतच एका नागरिकाला जखमीदेखील केले होते. त्यामुळे एकीकडे वाघ आणि दुसरीकडे रानटी हत्तींचा कळप, अशा दुहेरी संकटात वडसा (देसाईगंज ) रहिवासी आणि वन विभाग सापडल्याचे चित्र आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->