फिरायला निघाले अन् परतलेच नाही; 'सेल्फी' काढताना पाण्यात बुडुन दोन मित्राचा मृत्यू | BatmiExpress™

Warora,Warora News,Drowned,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Live,


वरोरा
: वरोरा तालुक्यातील चारगाव धरण येथे आज दुपारच्या सुमारास दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोळ्या निमित्याने कॉलेज ला सुट्टी असल्याने आनंद घेण्यासाठी चारगाव धरण येथे फिरायला जाणयासाठी सर्व मित्र एकत्र येऊन ठरविले व चारगाव धरण इथे आले होते.

सदर धरणाचे निसर्गरम्य दृश्य बघून हार्दिक गुलघाने याने सेल्फी काढण्यास सुरवात केली. परंतु सेल्फी काढत असताना पाय घसरून हार्दिक पाण्यात पडला. त्याला वाचविण्याकरिता आयुष चीडे गेला असता तो सुद्धा पाण्यात पडला. तेव्हा या दोघाचा मृत्यू झाला.

सविस्तर वृस्तात: वरोरा तालुक्यातील चारगांव बु. येथील धरण जवळ फिरायला वेतम चंद्रकुमार जयस्वाल वय 19 रा. शेगाव, मयूर विजय पारखी वय 20 रा. वरोरा, आश्रय संजू गोळगोंडे वय 19 रा. वरोरा, हार्दिक गुळघाणे वय 19 वर्षे रा. शेगाव, आणि, आयुष चिडे वय 19 रा. वरोरा हे गेले होते. दरम्यान हार्दिक गुळघाने हा धरणा जवळ  फोटो काढायला गेला असता त्याचा पाय घसरुन तो तलावात पडला. हार्दिकला वाचवायला आयुष चिडे गेला असता तो पण धरणात बुडाला. बाकी मित्रांनी आरडाओरड करुन स्थानिक नागरिकांना बोलविले परंतु खूप उशीर झाल्याने हार्दिक आणि आयुष यांचां शरीर खोल धरणाच्या पाण्याच्या आत गेला त्यामुळे स्थानिक लोकांच्या मदतीने बुढलेल्ल्या हार्दिक आणि आयुष यांचा शोध पोलीस कर्मचायांनी घेतला.

पोलिसांनी कोळी बांधव व स्थानीक नागरिकांच्या मदतीने या बालकाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरु केली, दोन तासांच्या अथक परिश्रमा नंतर पोलिसांना कोळी बांधवांच्या मदतीने मृतदेह धरणाच्या बाहेर काढण्यात यश आले मृतदेहाला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात पुढील तपास पोलीस करीत आहे


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.