कोरची: आंदोलनाचा इशारा; कोटगुल परिसरातील समस्याचे निराकरण करा | BatmiExpress™

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,
Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

  • कोटगुल परिसरातील समस्याचे निराकरण करा 
  • अन्यथा कोटगुल परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

कोरची ( तालुका मोबाइल प्रतिनिधी  ) :-   संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सुरू असताना समस्येच्या माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरची तालुक्यातील कोटगुल परिसरातील नागरिकांना अनेक समस्या उद्भवत असून समस्याचा निराकारण कोण करणार व कोण तालुक्याचा वाली होणार याकरिता कोरची तालुक्यातील लोक प्रतिनिधी व शेकडो नागरिकांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. असूनत्यांनी आपल्या निवेदनात त्यांना उद्भवणार्‍या समस्यांचे ठळक मुद्दे मांडलेले असून संपूर्ण बाबींचा विचार करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे असे निवेदनात त्यांनी म्हटले असून त्यावर गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा 1 सप्टेंबरला रोजी मुरुमगाव ते  छत्तीसगडला जाणाऱ्या महामार्गावर मुलाबाळांना सोबत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा लोकप्रतिनिधी व नागरिकांनी दिला आहे. 

त्यांनी आपल्या निवेदनात मौजा ढोलडोंगरी 33kv उपकेंद्र मागील दहा वर्षापासून मंजूर असून सुद्धा अद्यापही कामाला सुरुवात झालेली नसून ते सुरू करण्यात यावे. ,कोटगुल परिसरातील बीएसएनएलची 4G सेवा सुरू करण्यात यावे. ,कोटगुल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून नागरिकांना पुरी सेवा मिळत नसल्यामुळे पन्नास किलोमीटर कोरची येथे यावे लागत असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून, त्यासाठी कोटगुल येथे ग्रामीण रुग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे. ,अति पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले त्याच प्रमाणे घरे गुरांचे गोठे ,पडझड झाले त्यांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्द्यावी. कोरची -बोरी -सायगाव- ग्यारापत्ती पर्यंतबस सेवा सुरू करण्यात यावी. शासनाकडून पक्के रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले असून सदर कामाचे चौकशी करून पुनश्च रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे. ,खरीप हंगाम वर्ष 2021 ते 2022 सत्राचे आदिवासी महामंडळाकडून अद्याप प्राप्त न झालेल्या बोनस शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे. नरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचा लाभ माहे फरवरी ते मार्चपर्यंत मजुरी अद्याप मिळाली नसल्याने सदर मजुरी मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. ,कोटगुल परिसरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात यावे जेणेकरून लोकांना कामाप्रती गैरसोय होणार नाही. ,कोटगुल क्षेत्रातील पीटेसुर-अलोडी- मिसपिरि जाण्याकरिता गैरसोय होत असल्यामुळे सदर रस्ता व पुल बांधकाम करण्यात यावे. कोटगुल परिसरातील दूगाटोला व अरमुरकसा येथे  मोठा तलाव आवश्यक असून सदर कामाला मंजुरी देण्यात यावी. 

सदर निवेदनात या मागणी असून संपूर्ण मागण्या पूर्ण करावे अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले असून ,निवेदन प्रभारी नायब तहसीलदार गजभिये यांच्याकडे देण्यात आले. यावेळी मंजुषा कुंमरे ,अनिल जनबंधू, कलावंती हलामी, शांताराम टेंभुर्ण, इंदल कुमार, रमेश लोहबरे, संतानू धीकोडी, गुलशन नैताम, चैनूराम ताडामी, मोहन कुरचाम ,गांगसाय मडावी ,श्रावण आतलाम ,राजेश नैताम ,आनंद सुदुल आदी  सरपंच,  उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.