देसाईगंज (वार्ता) : येथील पशुमित्र तथा श्री महादेव जानकार यांच्या राष्ट्रीय समाज पक्षालाचे सक्रीय पदाधिकारी असलेले श्री प्रकाश जिवानी यांनी नुकतेच आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने देसाईगंजच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
मागील निवडणूकीत पशुमित्र जिवानी यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे काम केले एवढेच नाही तर त्यांनी निवडणूकी दरम्यान रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकार यांना देसाईगंजात बोलाविले होते. तर तेव्हापासून ते रासप पक्षात राहून सक्रीयपणे कार्य करीत होते. तर त्यांची पशुविषयी संवेदना पाहून त्यांची ओळख आता पशुमित्र म्हणून होत आहे. तर पशुप्रेमासह मनुष्यप्रतीही त्यांची तेवढी संवेदना असल्याने व राजकारणात राहून आपल्या हातून चांगले कार्य करावयाची इच्छा असल्याचे पाहता नुकतेच त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. सदर प्रवेश आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मार्गदर्शनात विदर्भ अध्यक्ष डॉ. देवेंद्र वानखेडे, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण सावसागडे, मनोहर पवार, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, शहर अध्यक्ष कैलास शर्मा आदींच्या उपस्थितीत गडचिरोली येथील विश्राम गृहात आयोजित बैठकीत करण्यात आले. यावेळी प्रकाश जिवानी यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जवाबदारी सोपविण्यात आली. तर आपल्याला पक्षाच्या ध्येय धोरणाची जाण असून जिल्ह्यात आम आदमी पक्ष वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असून लवकरच देसाईगंजच्या एका माजी नगराध्यक्षाचा आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती जिवानी यांनी प्रस्तृत प्रतिनिधीला दिली.
यावेळी देसाईगंज शहर अध्यक्ष आशिष घुटके, शहर उपाध्यक्ष नवेद शेख, शहर सचिव तरबेज खान इत्यादी उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.