कोरची: मुख्य रस्त्यालगत असणारी झुडपी झाडे हटवण्याची मागणी, नगरपंचायत कोरचीचे दुर्लक्ष | BatmiExpress™

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची ( तालुका मोबाइल प्रतिनिधी  ) 
: - येथील गांधी वार्ड पासून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठेमोठे कचरा झुडपी झाडे वाढलेली असून,  सदर रस्ता हा मुख्य बाजारपेठेत जात असून ,या रस्त्यावरून बरेच लोक मार्गक्रमण करीत असतात. या रस्त्यावर मोठेमोठे कचरा झुडपी झाडे वाढलेली असल्यामुळे ज्यामध्ये अनेक विषारी जीवजंतू  व , विषारी साप अनेक वेळा रस्त्यावरून जाताना नागरिकांना आढळून आलेले आहे. करिता मार्गक्रमण करताना नागरिकांना विषारी जीव जंतू पासून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वी कोरची तालुक्यात अनेक लोकांना विषारी जीव- जंतू व विषारी सापामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला असून, कोणताही घातपात होऊ नये म्हणून याकडे नगरपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यालगत वाढलेली झुडपी व कचरा झाडे साफ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.