कोरची: पारबताबाई विद्यालयात विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी | BatmiExpress™

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची ( कोरची मोबाइल प्रतिनिधी) 
:-  येथील पारबताबाई विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण रुग्णालयातर्फे वर्ग 5वि ते10 वी च्या विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यसाठी तालुका स्तरावर स्वंतत्र पथक तयार करण्यात आला आहे. ग्रामीण रूग्णालयाचे वैधकिय अधिकारी, डॉ सचिन बरडे , डॉ शितल उईके ,औषधी निर्माता केदार मारवाडे  व परिचारीका उमा देवांगन यांनी विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केली. जे विद्यार्थी आजारी होते. त्यांना औषधाचे वितरण करण्यात आले.

अस्वच्छतेमुळे बहुतांश आजार तयार होत असल्याने डॉक्टरांनी विद्यार्थ्यानां शरीराची स्वच्छता कशी राखावी याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने संपूर्ण तालुक्यात अश्या प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहेत. विद्यार्थ्याच्या शारीरिक स्वच्छतेबाबत शिक्षकांनीही विशेष दक्ष असणे गरजेचे आहे. प्रार्थनेच्या पूर्वी किंव्हा प्रार्थना संपल्यानंतर नखे व हातांची तपासणी करणे गरजेचे आहे.

स्वच्छतेबाबत जनजागृती आवश्यक:

ग्रामीण भागात शारीरिक व परिसरातील स्वच्छतेबाबत अजूनही जनजागृती झाली नसल्याचे दिसून येते. घराच्या मागच्या बाजूस खताचे खड्डे गवत राहत असल्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमानात होते. परिणामी विद्यार्थी व नागरिक मलेरिया सारख्या आजारांना बळी पडतात. झोपतेवेळी मच्छरदाणिचे मोफत पुरवठा केला जातो. या मच्छरदाणीचे वापर करणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.