कोरची: बौद्ध समाजाचे नगरपंचायतला निवेदन | BatmiExpress™

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,
Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

  •  बौद्ध समाजाकरिता सभामंडप व वाल कंपाऊंड बांधून देण्याची मागणी, विविध योजनांच्या विषयांवर चर्चा.

कोरची- कोरची नगरपंचायतला दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत लाखो रुपयांचे निधी प्राप्त झाले आहेत. या निधीमधून बौद्ध समाजाच्या जागेवर सभामंडप व वालकंपाऊंड तयार करण्यात यावा याकरीता  येथील बौद्ध समाज व रमाई बहुउद्देशीय सामाजिक महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना 25 आगस्ट ला निवेदन दिले. कोरची येथे बौद्ध समाजाची 600 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे दलित समाजाला मिळणाऱ्या सर्व योजना समाजाला मिळायला पाहिजे. 

२०१५ पासून आजपर्यंत दरवर्षी या योजनेअंतर्गत लाखोंचा निधी मंजूर होत आला आहे .शासन नियमाप्रमाणे हा निधी दलितांच्या वस्तीत नाली, वीज, पाणी, रस्ते, सभामंडप, वाल कंपाउंड इत्यादी कामाकरिता खर्च करायला पाहिजे. परंतु कोरची या गावात दलितांची वस्ती एका ठिकाणी नाही .दलितांची घरे संपूर्ण गावभर विखुरली आहेत. त्यामुळे दलित समाजाला  या योजनेचा लाभ मिळाला नाही. तरीही हा निधी दलितांच्या वस्तीत खर्च केल्याचे आजपर्यंत कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. निवेदन याप्रमाणे आहे की, दलित वस्ती सुधार योजना/नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या संपूर्ण  निधीचा कोरची येथील बौद्ध समाजाच्या जागेत सभामंडप करून द्यावे. सोबतच वाल कंपाउंड तयार करून द्यावे .

तसेच यानंतर भविष्यात या योजनेअंतर्गत येणाऱ्या निधीची विल्हेवाट आम्ही प्रस्तावित केलेल्या विषयावर विचार करावा यासाठी निवेदन देण्यात आले. 

यावेळी कोरची नगरपंचायतचे उपमुख्याधिकारी बाबासो हाक्के यांना कोरची रमाई बहुउद्देशीय सामाजिक महिला मंडळच्या अध्यक्षा सौ ज्योती जीवन भैसारे, सचिव सौ छाया बालकदास साखरे, सौ पूनम कैलास अंबादे, बौद्ध समाजातील शालिकराम कराडे,जीवन भैसारे, चेतन कराडे, राहुल अंबादे,अविनाश हूमणे,संजय चौधरी, अरुण सहारे, रसिका सहारे, शिवलाल चौधरी,जयंत साखरे,इन्‍द्रपाल भैसारे, गुलाब भैसारे, तुलसी अंबादे, मोरेश्वर कराडे, चंद्रशेखर अंबादे, किशोरकुमार वालदे, यशोदा वालदे, जितेंद्र सहारे, बुद्धेलाल साखरे, बालकदास साखरे, ईश्वर साखरे, गौतम जनबंधु, गिरधारी जांभुळे, संगीता भैसारे, प्रमानंद उके, वनिता सहारे, कैलास अंबादे, चंद्रपाल भैसारे, अंकालु नंदेश्वर, पत्रकला जनबंधू, नीलकंठ अंबादे, कंचना कोचे, वनिता लाडे, ताराबाई साखरे, रोशन बोरकर यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.