आज गडचिरोली जिल्ह्याचा वर्धापन दिन
कोरची - कोरची मुख्यालयापासून अंदाजे 20 ते 22 किलोमीटर अंतरावर असलेला अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल गाव म्हणजे मयालघाट. या गावातील नागरिकांनी मागील आठ महिन्यापासून विजेचा प्रकाश पाहिलेला नाही. गावातील चार विद्युत खांब हे पूर्णपणे जर्जर अवस्थेत असून याकडे संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या गावात लहान लहान मुलांचा वास्तव्य सुद्धा आहे. मयालघाट येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संबंधित विभागाला या विषयी कित्येकदा निवेदन व माहिती सुद्धा देण्यात आली होती परंतु याकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. जर्जर झालेल्या विद्युत खांब ची दैनीय अवस्था झालेली आहे ते कधी पण कोसळुन खाली पडू शकतात.
आज गडचिरोली जिल्ह्याचे वर्धापन दिन असून 26 आगष्ट 1982 ला चंद्रपूर जिल्हा पासून वेगळे होऊन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु चाळीस वर्ष होऊनही अजूनही कोरची तालुक्यातील बहुतेक गावाने विकासाचा सूर्य पाहिलेला नाही असे दिसून येत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष व जिल्हा निर्मिती ला 40 वर्ष पूर्ण होऊनही कोरची तालुक्याचा कोणी वाली आहे का? असा प्रश्न नागरिकांना निर्माण होत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.