मोठी बातमी! एकतर्फी प्रेम प्रकरणातून शिशुकलाची हत्या, देवरी येथील घटना | BatmiExpress™

Gondia,Deori,Gondia Crime,Gondia Live,gondia news,Gondia Marathi News,

Gondia,Deori,Gondia Crime,Gondia Live,gondia news,Gondia Marathi News,

देवरी
:- स्थानीक वार्ड क्र. ६ येथील पंचशील चौक परिसरात १७ ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या घरात शिरून शिशुकला मेघनाथ साखरे (४०) या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आता देवरी पोलिसांनी पुर्णत्वास आणला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक केली असून त्याचे नाव अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र सदर आरोपीने एकतर्फी प्रेम प्रकरणातून शिशुकलाची हत्या केली असल्याची सुत्राकडून माहिती आहे. ( Murder News

स्थानिक प्रभाग क्र. ६ येथे भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या मेघनाथ साखरे यांची पत्नी शिशुकला साखरे हिची १७ ऑगस्ट रोजी घरात शिरून दिवसाढवळ्या अज्ञात आरोपीने हत्या केली. ही बाब सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून श्वान पथक, फिंगरप्रिंट एक्सपर्टच्या माध्यमातून तुर्त तपास कार्याला सुरुवात केली. मात्र काहीही हाती लागले नाही. त्यामुळे देवरी पोलिसांनी सर्व तांत्रिक बाबीची पडताळणी करीत तपास कार्याला सुरुवात केली. भ्रमणध्वनी संचावरून संपर्कात आलेल्या सर्व संशयीतांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र काहीही उलगडा लागला नाही. परंतु घटनास्थळी प्राप्त झालेल्या काही संकेतावरून आरोपी हा त्या कुटुंबाशी निगडीत असावा, असे पोलिसांना समजले. यावरून साखरे कुटुंबियाशी नियमीत संपर्कात असणाऱ्या एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने शिशुकलाची एकतर्फी प्रेम प्रकरणातून शारीरिक सुखाला नकार दिल्याच्या कारणावरून हत्या केल्याची बाब समोर आली आहे. असे विश्वसनिय सुत्राकडून माहिती प्राप्त आहे. आरोपीला देवरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप तपास कार्य पुर्ण न झाल्यामुळे पोलिसांकडून अधिकृत रित्या आरोपीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. आगामी एक-दोन दिवसात देवरी पोलिस या प्रकरणाचा उलगडा करणार असल्याची माहिती आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.