चंद्रपूर: एका सामान्य व्यक्तीच्या अटकेला एवढं महत्व देण्याचं कारण नाही : सुधीर मुनगंटीवार - BatmiExpress™

Chandrapur,ED News,Sudhir Mungantiwar,Sanjay Raut,Sanjay Raut ED,Sanjay Raut ED Live Updates,

Chandrapur,ED News,Sudhir Mungantiwar,Sanjay Raut,Sanjay Raut ED,Sanjay Raut ED Live Updates,

चंद्रपूर
: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडी (ED) न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांना चार दिवसांची ईडी को़ठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी प्रतिक्रीया दिली असून एका सामान्य व्यक्तीला एवढं महत्व देण्याचं काही कारण नाही असं म्हण्टलं आहे. ( Sanjay Raut ED Live Updates )

कधी महिलांचा अवमान करायचा, कधी विरोधी पक्षांचा अवमान करायचा, वाट्टेल ते बोलायचे. पंतप्रधानांबद्दल वाईट बोलायचे. हे बोलत असताना मात्र, त्यांना विसर पडला की, ते सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत अशी टीका मुनगंटीवार म्हणाले. (ED)

पुढे ते म्हणाले, छत्रपती म्हणायचे, ही तर श्रींची इच्छा. आता यांना अटक झाल्यावर, आम्हीही हेच म्हणतो. राऊत यांना अटक, ही तर श्रींची इच्छा, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.