- कोरची तालुक्यातील बौद्ध समाजाकडून तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
ऑगस्ट २०, २०२२
0
कोरची: राजस्थान राज्यातील इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या छैलसिंग या शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करून त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्याबाबत कोरची तालुक्यातील बौद्ध समाजाकडून तहसिलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती यांना 19 ऑगस्ट शुक्रवारी निवेदन देण्यात आले आहे.
राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सुराना गावातील सरस्वती विद्यामंदिर या शाळेत इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या इंद्रकुमार मेगवाल या विद्यार्थ्याला केवळ त्याने शिक्षकांसाठी असलेल्या माठातील पाणी प्यायला होता त्यामुळे त्या शाळेतील शिक्षक छैलसिंग याने त्या मुलाला २२ जुलै २०२२ ला अत्यंत क्रूरपणे जातीवादी व अस्पृश्यतेच्या मानसिकतेतून त्या विद्यार्थ्याची जबर मारहाण केली त्यामुळे इंद्रकुमार या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान १३ ऑगस्ट ला मृत्यू झाला.
इंद्रकुमार या विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या छैलसिंग या शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करून त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी तसेच तथाकथित लोक सदर प्रकरण दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत असे होऊ नये अन्यथा तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्हा व राज्यातील बौद्ध समाज पुढे आंदोलन करणार असे निवेदनात म्हटले आहे.
कोरची तहसील कार्यालयातील नवनियुक्त नायब तहसीलदार महानंदा मडावी यांना निवेदन देताना कोरची तालुकातील बौद्ध समाजातील गिरधारी जांभुळे, मुख्याध्यापक शालिकराम कराडे, प्राचार्य विनोद चहारे, मुख्याध्यापक चंद्रशेखर अंबादे, तालुका मुक्तीपथ संघटक निळा किन्नाके, सामाजिक कार्यकर्ता राहुल अंबादे, बुद्धेलाल साखरे, संजय चौधरी, बालकदास साखरे, जयदेव सहारे, कमलेश भानारकर यावेळी उपस्थित होते.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.