कोरची: स्वातंत्र्याच्या 75 व्या ध्वजारोहणाला विद्युत सहाय्यक अभियंता अनुपस्थित चौकशी करून कार्यवाही करा - आशिष अग्रवाल | BatmiExpress™

Be
0

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची
( चेतन कराडे - तालुका प्रतिनिधि ) : संपूर्ण देशात भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आजादी का अमृत महोत्सव साजरे करण्यात आले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी पदाधिकारी यांना ध्वजारोहण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. अशीच सूचना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण चे वरिष्ठ अभियंता डोंगरवार यांनी कोरची येथील सहाय्यक अभियंता प्रफुल कुळसंगे यांना दिली होती. परंतु 14 तारखेला रात्रभर प्रफुल कुळसंगे हे कोरची वासियांना अंधारात ठेवून बाहेर गेले होते व 15 ऑगस्टला सकाळी कार्यालयात अनुपस्थित असल्यामुळे विद्युत विभागाचे मुख्य तंत्रज्ञ धाकडे यांनी ध्वजारोहण केले. संपूर्ण देश आजादी का अमृत महोत्सव साजरा करीत असताना निष्काळजीपणाने फिरणाऱ्या सहाय्यक अभियंता यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती कोरची चे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी केली आहे.

कुळसंगे यांनी संपूर्ण तालुका वाशीयांना अंधारात तर ठेवलेच तसेच आपल्या वरिष्ठांना सुद्धा अंधारात ठेवून ध्वजारोहणाच्या दिवशी अनुपस्थित होते. यापूर्वीसुद्धा 25 जानेवारीला अन्याय, अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती कोरची तर्फे कुळसंगे यांच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात आले होते. ज्यामध्ये चौकशी समितीने चौकशी मध्ये आपल्या कर्तव्यावर कसूर करणाऱ्या कुळसंगे यांना 51,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. सद्यस्थितीत कोरची तालुक्यात विद्युत पुरवठा हा चिचगड व कुरखेडा अशा दोन ठिकाणाहून असताना सुद्धा कुळसंगे यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त तालुका अंधारमय झालेला आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावावर आज पर्यंत किती निधी खर्च करण्यात आला? या वर्षी फांद्या छाटण्याचे काम खरच करण्यात आले का? या संपूर्णची चौकशी करून कुळसंगे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करू असा इशारा आशिष अग्रवाल यांनी दिला आहे.

कोट: 

आम्हाला प्रफुल कुळसंगे यांनी स्वतः ध्वजारोहण केले असल्याची माहिती दिली. 15 ऑगस्टला त्यांनी कुठलीही सुट्टी घेतली नव्हती. याबाबतची संपूर्ण चौकशी केली जाईल.

एस. एस. डोंगरवार

कार्यकारी अभियंता

म. रा. वि. वि. गडचिरोली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->