ब्रम्हपुरी:- गोसेखुर्द (Gosikhurd ) धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे ब्रह्मपुरी ( Bramhapuri Flood ) तालुक्यातील वैनगंगा नदीला पूर ( Wainganga River Flood) आला आहे. पुरामुळे नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणी शिरले असून पिंपळगाव (भो.) शिवारातील अंदाजे 500 ऐकर जमीन पाण्याखाली गेली आहे. काल ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा अतुल भाऊ देशकर ( Atul Deshkar ) यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथे पूरपरिस्थितीची भाजपा पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली.
पिंपळगावाला यावर्षीच तिसऱ्यांदा आलेला हा पूर आहे. पिंपळगावातील समस्या मोठ्या आहे. या वेळी नागरिकांच्या समस्यांची नोंद प्रा. अतुल देशकर यांनी केली. पावसामुळे गावातील पडझड झालेल्या घरांची ही पाहणी माजी आमदार देशकर यांनी केली. व प्रसंगीच यासंदर्भात गावाच्या तलाठी सोबत फोन वर चर्चा केली.
यासोबत पूरपरिस्थिती संदर्भात माजी आमदार अतुल देशकर यांनी उपविभागीय अधिकारी व पंचायत समिती ते संवर्ग गटविकास अधिकारी यांच्यासोबत येथील उपविभागीय कार्यालयात बैठक घेऊन पूरपरिस्थिती बाबत उपाय योजना करण्यासंदर्भात भेट घेतली. पूर प्रभावित गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत चर्चा झाली. यासोबतच पुराचे पाणी ओसरल्यानंतर फवारणी करणे बोरिंग प्लस करणे आरोग्य विभागाची टीम गावात पाठविणे व स्वच्छ करणे याबाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा चे प्रदेश कार्य सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, ज्येष्ठ नेते अरुण शेंडे, माजी जि.प सदस्य उमाजी कुथे, माजी उपसरपंच हेमराज कामडी, हरीश शेबे, सुधीर दोनाकडर, भाजपा नगर महामंत्री मनोज भूपाल, कोषाध्यक्ष अरविंद नंदुरकर, साकेत भानारकर, भाजपा ओबीसी आघाडी शहराध्यक्ष प्रा अशोक सालोडकर, भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, भाजपा ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रेमलाल धोटे यांच्या सह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.