कोरची: अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम गंभीर जखमी | BatmiExpress™

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Accident,Accident News,Gadchiroli Accident News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Accident,Accident News,Gadchiroli Accident News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची
:- पकनांभट्टी वरून पायदळ कोरचीला येत असताना गोठूल भूमी जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने कोरचीतील गौरी चौकातील एका इसमाला धडक देत गंभीर जखमी करून फरार झाल्याची घटना शनिवारच्या रात्री 8 वाजता दरम्यान घडली आहे. 

जखमी खोरबहारा पतीलाल जमकातन (वय 56वर्ष ) राहणार कोरची असे जखमीचे नाव आहे जमकातन हे व्यक्तिगत कामासाठी शनिवारी सायंकाळी पकनाभट्टी येथे गेले होते. परत येताना कोरची - देवरी महामार्गावरील गोटूल भूमीजवळील रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. ते जागेवरच बेशुद्ध अवस्थेत पडून होते. मार्गक्रमण करणाऱ्या लोकांनी कोरची ग्रामीण रुग्णालयात तत्काळ दाखल केले. त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. लहान मेंदूला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया व उपचारासाठी नागपूरला हलविण्याची गरज असल्याची माहिती मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.