ऑगस्ट २९, २०२२
0
सविस्तर वृत्त असे की, बळीराम हा सरपन गोळा करण्यासाठी जंगलात गेला असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने बळीरामवर हल्ला करून ठार केलें. ही घटना शंकरनगर जोगिसाखराच्या मधोमध जंगल परिसरात घडली. बळीराम कोलते हा सालमारा येथील रहिवासी असून त्याला चार मुली आणि पत्नी असा परिवार आहे. घरचा कर्ता इसम गेल्याने कोलते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच बळिरामच्या जाण्याने कोलते कुटूंब व गावपरीसर शोकसागरात बुडालेला आहे. वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता संबधित वनविभागाने नरभाक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोलते कुटुंबियांनी व ग्रामवासियानी केली आहे. तसेच मृतक बळिराम च्या कुटुंबियांना आथिर्क मदत द्यावी.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.