देसाईगंज (वडसा) - संपूर्ण देशामध्ये साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्याने देशभर विविध कार्यक्रम हर घर तिरंगा हा उत्सव मोठ्या उत्साहाने शासन स्तरावर पार पडल्या जात असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिवाळीच्या सणासारखा रोषणाई लाऊन साजरा करीत असल्याचे देसाईगंज तालुक्यात दिसून येत आहे.
देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय व जवळील कार्यालय इमारतीला तिरंगा रोषणाईने सजविल्या असून देसाईगंजवासिय नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
तसेच मागील तीन दिवसापासून सर्वच शासकीय, सार्वजनिक शैक्षणिक संस्था शासकीय, निमशासकीय कार्यालये सोबतच ग्रामीण भागातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( हर घर तिरंगा ) मोठ्या उत्साहाने साजरा करीत असल्याची लगबग अधिकारी व कर्मचारी यांची दिसून येत आहे.