बीड : जिल्ह्यातील पाटोदा मांजरसुंबा महामार्गावरील पाटोद्याजवळ आज भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पो आणि कारचा मोठा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बीड जिल्ह्यातील पाटोदा मांजरसुंबा महामार्गावरील पाटोद्याजवळ आयशर टेम्पो आणि स्विफ्ट डिझायर कारचा मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती कळताच घटनास्थळावर पाटोदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते दाखल झाल्यानंतर अपघाता मधील सर्व मृतांना व जखमींना बाहेर काढले.
हा टेम्पो- कारचा अपघात एवढा भीषण होता की, मोठा आवाज झाला. आवाज ऐकूण त्या ठिकाणच्या ग्रामस्थांसह येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढले. परंतु या अपघातात सहा जणांनं आपलं जीव जागीच गमवावं लागलं.