'
30 seconds remaining
Skip Ad >

Gondwana University: शैक्षणिक शुल्क न घेता प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ - BatmiExpress™

0

Gondwana University,Gadchiroli News,Chandrapur News,Chandrapur,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Gadchiroli Batmya,

चंद्रपूर/गडचिरोली:- आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. गरज आहे ती, त्यांच्या क्षमतेला शिक्षण आणि रोजगाराची जोड देण्याची. हीच बाब लक्षात घेऊन आदिवासीचे कौशल्य जगासमोर आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाकरिता मोफत प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ (Gondwana Universityहे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

बरेचदा विद्यार्थ्यांना एखाद्या कोर्सला प्रवेश घेताना आर्थिक चणचण जाणवत असते आणि मग प्रवेश घ्यायचा राहूनच जातो. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थीतीचा विचार करून विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी संपर्क अभियान सुरू केले आहे. प्राध्यापक स्वतः या भागात फिरून विद्यार्थ्यांना माहिती देतात. जेणे करून विद्यार्थी शिक्षणाकडे वळतील. गडचिरोली बसस्थानक ते गोंडवाना विद्यापीठापर्यत प्रवासासाठी बसची सुविधाही करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश तसेच क्रांतिवीर बाबूराव शेडमाके कमवा आणि शिका योजने अंतर्गत त्यांना आर्थिक मदत होणार आहे. वसतिगृहात अधिक विद्यार्थी सामावून घेण्यासाठी विद्यापीठाने शासकीय विज्ञान महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाचे वसतिगृह घेण्याचे ठरवले आहे. तेथून विद्यापीठात येण्याची व जाण्याची मोफत सोय विद्यापीठ करीत आहे. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटला अधिकाअधिक महत्व देत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे.

विद्यार्थ्यांना विद्यापीठापर्यंत येण्यास त्रास होऊ नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रवेशाकरिता विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थी सुविधा केंद्र श्री शंकरराव बेझलवार आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालय ,अहेरी आणि शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय तुकुम, चंद्रपूर येथे नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एम .ए. इंग्रजी ,समाजशास्त्र, इतिहास उपयोजित अर्थशास्त्र, मराठी ,जनसंवाद ,एम कॉम, एमएससी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ,संगणक शास्त्र, एमबीए या सर्व अभ्यासक्रमाच्या २०२२-२३ च्या प्रशम वर्षाकरिता मोफत प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ आहे. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हाच ध्यास विद्यापीठाने घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×