'
30 seconds remaining
Skip Ad >

मोठी बातमी: कारच्या अपघातात मुलगा जागीच ठार; आई-वडील जखमी | BatmiExpress™

0

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Accident News,Gadchiroli Batmya,Accident,Accident News,Accident News Live,

गडचिरोली
:- गडचिरोली येथील प्रतिष्ठित इलेक्ट्रिक ठेकेदार सुनील बट्टूवार यांचा आज (ता. २२) पहाटे चार वाजता भिवापूर जवळील नाल्याच्या पुलाला त्यांच्या कारची धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात सुनील बट्टूवार यांचा मुलगा जागीच ठार झाला तर पत्नी व ते स्वतः गंभीर जखमी आहेत. दोघांनाही नागपूर येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार सुनील बट्टूवार यांची मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत आहे. ती अमेरिकेत शिक्षण घेण्याकरिता जात होती. तिचे विमान रात्री अडीच वाजता असल्यामुळे बट्टूवार दांपत्याने तिला एअरपोर्टला अडीच वाजता सोडले व मुलाची सकाळची शाळा असल्यामुळे परत गडचिरोलीला येण्याकरिता निघाले. दरम्यान भिवापूर जवळ गाडी चालवत असताना गाडीवरचे नियंत्रण सुटले व जवळील नाल्याच्या पुलावर गाडीने धडक दिली.

या धडकेत गाडी पुलाच्या खाली उतरून जोरदार उलटी खात रस्त्यावरून खाली उतरली. या अपघातात मुलगा कृष्णा सुनील बट्टूवार याचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील बट्टूवार यांच्या छातीला व मानेला जबर दुखापत झाल्यामुळे त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या पत्नीला मानेवर जबर मार बसल्याचे सूत्रांकडून कळले आहे.

या घटनेची माहिती गडचिरोलीत पसरताच सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नेमका अपघात कशामुळे झाला, याचे कारण सध्या पुढे येऊ शकले नाही. मुलगा कृष्णाच्या पार्थिव शरीराला अग्नी देण्यात येईल, अशी माहिती कुटुंबीयांकडून मिळाली आहे. मुलगी अमेरिकेला जात असताना तिला माहिती मिळताच ती गोव्यावरून परत निघाली असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×