चंद्रपूर ( Chandrapur Rain ) :- भारतीय हवामान विभागाने 8 ते 10 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर आज चंद्रपूरसाठी रेड अलर्ट जारी ( Chandrapur on 'red' alert Chandrapur on 'red' alert ) केला आहे. मागील दोन दिवसापासून वैनगंगा, वर्धा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द प्रकल्प, वर्धा नदीवरील अप्पर वर्धा प्रकल्प व निम्न वर्धा प्रकल्प, इरई नदीवरील इरई धरण, पैनगंगा नदीवरील ईसापुर धरण व वर्धा नदीच्या उपनद्या वरील धरणांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहित करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याचा येवा वाढल्यास धरणातून विसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ( Chandrapur on 'red' alert )
परिणामी, जिल्ह्यात वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा, पैनगंगा व इरई या नद्यांकाठी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या हवामान विभागाने दिलेला पावसाचा रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट तसेच वैनगंगा, वर्धा, पैनगंगा व इरई नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे.