चंद्रपूर:- प्रसूतीसाठी गर्भवती महीलेला रूग्णालयात दाखल व्हायच होतं. मात्र पुराने दोन ठिकाणी मार्ग अडविला होता. अश्या स्थितीत आशा वर्कर महीलेने धाडस दाखविलं. गर्भवती महिलेला सोबत घेत आशा वर्करने डोंग्याने मार्गातील दोन पुर पार केले अन ग्रामीण रूग्णालयात पोहचविले. ( Chandrapur Flood )
गोंडपिपरी तालुक्यातील नवीन पोडसा येथील पिंकुताई सुनील सातपूते या गर्भवती होत्या. त्यांना प्रसुतीसाठी गोंडपिपरीतील ग्रामीण रूग्णालयात भरती व्हायचे होते. मात्र मार्गावरील दोन नाल्यांना पुर आला आहे. त्यामुळे मार्ग बंद आहे. अश्या स्थितीत सातपूते कुटुंबिय चिंताग्रस्त झाले. गावातील आशा वर्कर व आरोग्य सेविका यांच्या मार्गदर्शनात पिंकुताईला आरोेग्य मार्गदर्शन सुरू होते.
पण कुठल्याही स्थितीत तिला ग्रामीण रूग्णालयात भरती होणे आवश्यक होते. अश्या कठिण स्थितीत आशा वर्कर संगीता ठाकूर यांनी गर्भवती महीलेला सोबत घेत डोंग्याने प्रवास सूरू केला. वेडगाव ते सकमुरच्या समोर पर्यत डोंग्याने प्रवास करित त्या शेवटी गोंडपिपरीला पोहचल्या.तिथून महीलेला जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले. आशा वर्करचा धाडसाचे कौतुक होत आहे.
Chandrapur:- A pregnant woman had to enter the hospital for delivery, but the flood blocked the way at two places. In such a situation Asha worker woman showed courage. Taking the pregnant woman along, the Asha worker crossed two rivers on the way by boat and took her to the rural hospital.
Pinkutai Sunil Satpute of Navin Podsa in Gondpipari taluka was pregnant. She wanted to be admitted to the rural hospital in Gondpipari for delivery. Under the guidance of Asha workers and health workers of the village, health guidance begins for Pinkutai.
But in any case she had to be admitted to a rural hospital. In such a difficult situation, Asha worker Sangeeta Thakur started the journey by canoe along with the pregnant woman. She traveled by canoe from Vedgaon to Sakmur front and finally reached Gondpipari. From there the woman was referred to the district hospital. Asha worker is being appreciated for her courage.