'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! जन्मदात्या बापाने केला पोटच्या मुलाचा खून | BatmiExpress™

0
Pombhurna,Pombhurna News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Crime,Chandrapur Live,Chandrapur Today,murder,Murdered,

पोंभूर्णा
:- पोंभूर्णा तालुक्यातील मोहाडा ( रै) येथील जन्मदात्या बापाने पोटच्या मुलाचा खून ( Birth father killed unborn child ) केल्याची घटना गुरूवारच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. समीर कन्नाके (Sameer Kannake ) वय २० वर्ष असे मृतकाचे नाव असून घरगुती वादातून हा रक्तसंहार घडला आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील मोहाडा ( रै.) येथील बंडू शिवराम कन्नाके याचे आपला मुलगा समीर कन्नाके वय २० वर्षे यांचे सोबत मुलगा दारूच्या आहारी गेल्यामुळे पटत नव्हते. बापाचे व मुलाचे रोज भांडण होत होते. दिड महिण्यापुर्वी मृतक समीर याने आपल्या बापाला बेदम मारहाण केली होती. यात वडिल गंभीर जखमी झाला होता. व त्याला नागपूर येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले होते. तो काही दिवसांपूर्वीच मोहाडा येथे आला होता. मुलाचे झालेल्या भांडणामुळे पटत नसल्यामुळे तीन दिवसांपासून तो आपल्या शेतातील खोपडीत पत्नी व मुलीसोबत राहत होता. मृतक समीर हा गावातील घरात एकटाच राहत होता.
टनेच्या दिवशी मृतक समीर हा शेताकडे गेला त्याचे वडिलांसोबत कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात जन्मदात्या बापाने पोटच्या मुलाला बंडिच्या उबारीने डोक्यात वार केला. यात समीर जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोंभुर्ण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी व उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×