|
वैनगंगा नदी पातळीत वाढ असतानाची स्थिती - कारधा |
|
Bhandara Flood Live Updates: गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात वाढलेला आहें. त्यामुळे वैनगंगेने धोका पातळी ओलांडली आहे. वैनगंगा नदीतील पूराचे पाणी भंडारा शहरातील 30 % भागात शिरले आहे. भंडारा शहर येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल( sdrf) व जिल्हा शोध व बचाव पथक सक्रिय. गणेश नगरी,गणेशपूर,टप्पा मोहल्ला येथे बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. तरी आता धरणाचा विसर्ग वाढविणे हा एकमात्र पर्याय उपलब्ध आहे. याकरीता येत्या पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 18000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.
बातमी एक्सप्रेस शॉर्ट न्युज कव्हरेज:
|
कस्तुरबा गांधी वॉर्ड भंडारा येथे पूरबाधिताना भोजन. |
|
सुकळी नकुल येथील वैनगंगा नदीचे बॅकवॉटर मुळे नाले भरून गावाजवळील शेतशिवारात पाणी भरलेले आहे. |
मौजा मुंढरी बु. ( मोहाडी)या गावातील नदी लगतच्या कुंभार टोला मधील लोकांचे गावातील जिल्हा परिषद शाळा येथे स्थानांतरित करणे सुरू करण्यात आले.