Bhandara Flood Live Updates: भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असुन सदर दरम्याण अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहे. तसेच बहुतांश शाळांमध्ये राहत शिबीर संचारीत आहेत. (Bhandara Flood )
ज्याअर्थी, भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व सभाव्य पूरपरिस्थितीमुळे होणारे अपघात टाळण्याकरीता दिनांक 17/08/2022 रोजी सर्व शाळा (खाजगी व शासकिय), अंगणवाडी व खाजगी शिकवणी वर्ग यांना सुट्टी देणे आवश्यक झालेलें आहे. ( Holiday announced for schools, Anganwadis in Bhandara district today )
त्याअर्थी मी संदीप कदम, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा संदर्भ क्र. 1 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून भंडारा जिल्ह्यातील पुरपरिस्थितीवर उचित नियंत्रण मिळविण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत दिनांक 17/08/2022 रोजी सर्व शाळा (खाजगी व शासकिय), अंगणवाडी खाजगी शिकवणी वर्ग यांना सुट्टी जाहिर करण्यात येत आहे. सदर आदेशाचे उल्लघन झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.