तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

MSRTC Bus Accident Indore: इंदूरहून महाराष्ट्राकडे येणारी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली, अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू - #BatmiExpress

Indore News,Indore ,Accident,Accident News,Accident News Live,Madhya Pradesh,Maharashtra,MSRTC Bus Accident Indore

Indore News,Indore ,Accident,Accident News,Accident News Live,Madhya Pradesh,Maharashtra,MSRTC Bus Accident Indore

इंदूर
: मध्य प्रदेशमधून अपघाताची मोठी बातमी आली आहे. इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाची बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धार जिल्ह्यातील खलघाट इथंही घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट इथे ही घटना घडली आहे. आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बलकवाडा येथील खलटाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर ही घटना घडली आहे.इंदूरवरून ही बस महाराष्ट्रातील अमळनेरकडे येत होती.मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत 13 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 12 ते 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

अजूनही बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.इंदूरजवळ अपघात झालेली एसटी बस MH 40 N 9848 ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आगारची असल्याची माहिती समोर आली आहे. इंदूरमधून ही बस सकाळी 7.30 ला अमळनेरच्या दिशेने रवाना झाली होती.या बसमध्ये 13 लहान मुले या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातून 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. पूर्णक्षमतेनंही बस भरलेली होती. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक प्रवाशी वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे.इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळल्याचे वृत्त असून यात ४० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची एमएच ४० एन९ ८४८ क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून रिटर्न प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस सकाळी कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एस. टी. खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.