चंद्रपूर (Education ): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे 20 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार होती. (5th, 8th Scholarship Exam 2022 )
मात्र सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्सखलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणा-या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा 20 जुलै ऐवजी आता 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल. यापूर्वी विद्यार्थ्यांना निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र 31 जुलैच्या परिक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी पत्रान्वये कळविले आहे.