HighLigths:
- आपातकालीन सेवा करीता बोट देण्याची मागणी गावकऱ्यांची प्रशासनाला केली
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
- गर्भवती महिलाना वेळेवर उपचार नाही
- गावात आरोग्य सेवा नाही
- २०२० साली आला होता महापूर यावर्षी सुद्धा महापूर येण्याची शक्यता
- गोसेखुर्दचे पाणी सोडल्याने पुरस्थिती निर्माण
गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे ( Gosikhurd Dam Open 33 Gates) उघडण्यात आले असून यापैकी 21 गेट 2 मिटरने तर उर्वरित 12 गेट 1.5 मिटरने उघडण्यात आले आहेत. या सर्व दरवाज्यातून 12306 क्युमेक्स ( 12-thousand-306-cumex-water ) पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. यामुळे गोसीखुर्द धरण क्षेत्रा खालील वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे.
त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसत आहे. ब्रम्हपूरी तालुक्यात वडसा-ब्रम्हपूरी मार्गावरील वैंनगंगा नदीकाठावर लाडज गाव आहे. याठिकाणी मागील चार दिवसापासून पुरस्थिती निर्माण झाली असून गावाचा संपर्क तुटलेला आहे. डोंगा प्रवास बंद केल्यामुळे गावातील ये-जा मार्ग बंद झाला आहे.
सन 2004-05 आणि 2015-2016 मध्ये पाण्यात बुडून अनेकांना आपलं जीव गमवावा लागला. सन 2020 मध्ये 1994 पेक्षाही मोठं महापूर आलं होत. संपूर्ण गावात पुराचे पाणी साचलेले होते. हेलीकॉप्टरच्या आणि बोटच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे लागले होते.
गावात आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतरांसाठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.
- अमोल रामकृष्ण मोहुर्ले गावकरी, लाडज
त्यामुळे लाडज गाव एकदा पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण मागील चार दिवसांपासून गावाच्या सभोवताल पुराचे पाणी असून येथील सर्वसामान्य जनतेचा जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराची पातळी कमी होईपर्यंत शासनाने एक आपतकालीन बोट (emergency boat ) व्यवस्था व आवश्यक सुविधा पोहचविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. परंतु मागणी करूनही अद्यापही येथे कोणतीच शासनाकडून मदत पोहचली नसल्यासाचे येथील नागरिकांनी सांगितले.
लाडज गावाचा पुरातून प्रवास कसा होतो?
- पहिला मार्ग - लाडज ते सावंगी (डोंगा प्रवास)
- दुसरा मार्ग - लाडज ते चिखलगाव (डोंगा प्रवास)
- तिसरा मार्ग - लाडज ते पिंपळगाव (डोंगा प्रवास)
लाडज गावाच्या सभोवताल पुराचे असल्यामुळे मार्ग बंद करण्यात आलं आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. कारण मार्ग बंद असल्याने विद्यार्थी शाळेत / महाविद्यालयात जाऊ शकत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी तात्काळ एक बोट देण्याची मागणी विद्यार्थानी प्रशासनाला केली आहे.