आरमोरी :- नेहमी सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य ,क्रीडा औद्योग, शैक्षणिक क्षेत्रात नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या युवारंग तर्फे आज दिनांक १४ जुलै २०२२ ला युवारंग च्या सदस्यांनी वैनगंगा नदीच्या पुला शेजारी असलेल्या पोलीस चौकी वर पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सहकार्य केले. ( Gadchiroli Flood 2022 Imapct )
तसेच आरमोरी वैरागड मार्गावर असलेल्या रामाळा रोड वर असलेल्या गाढवी नदीच्या पुलावर पाण्याची पातळी वाढल्याने नदीचे पूल पाण्याखाली बुडालेले होते. अश्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारची चुकीची घटना होऊ नये ही बाब ओळखून युवारंग च्या सदस्यांनी या ठिकाणी संपूर्ण दिवस भर प्रशासनासोबत सेवा दिली तर आरमोरी गडचिरोली महामार्ग बंद असल्याने नागरिकांना कुठल्याही प्रकारचा नाहक त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आली. ( Gadchiroli Flood 2022 )
याप्रसंगी युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे ,उपाध्यक्ष मनोज गेडाम, कोषाध्यक्ष प्रफुल खापरे ,संघटक नेपचंद्र पेलने, सुरज पडोळे ,युवारंग चे सदस्य श्रीराम ठाकरे, अंकुश दुमाने, सुरज ठाकरे, देवेंद्र कुथे, मयूर दिवटे, तुषार शिलार, नलेश खेडकर ,गोलू नागापुरे ,करण कुठे ,शुभम वैरागडे ,मयूर कांबळे, निखिल शिरपुरे ,यादव दहिकर ,अभिषेक जुआरे, ज्ञानेश्वर बारापात्रे, तुषार भोयर, विशाल कानतोडे, दादू मेश्राम ,शुभम कांबळे, गीतेश म्हशाखेत्री ,नीलेश खेडकर, पराग हारगुडे ,आकाश खेडकर, राहुल मेश्राम, मयूर मारबते, रोहित नैताम व पोलीस विभाग चे कर्मचारी उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.