नागपूर : मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सतत पावसाचा जोर मागील तीन दिवसांत वाढला आहे. हवामान खात्याने (Department of Meteorology) अतिवृष्टीचा इशारा (Warning of heavy rain) दिल्याने शुक्रवार १५ व शनिवार १६ जुलैला होणारे नागपूर विद्यापीठाच्या (Nagpur University) उन्हाळी परीक्षांचे (Summer Exams) सर्व पेपर रद्द (Cancel all papers) केले. या परीक्षांची पुढील तारीख लकवरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) परीक्षा व मूल्यमापन संचालक (Director of Examinations and Evaluation) डॉ. प्रफुल्ल साबळे (Dr. Praful Sable) यांनी दिली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहचू शकले नव्हते.
विद्यापीठाच्या क्षेत्रात नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा (Nagpur, Wardha, Gondia, Bhandara) हे चार जिल्हे येतात. या सर्व ठिकाणी पावसाची संततधार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार आणि शनिवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने १५ व १६ जुलैला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, याविषयीची माहिती सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांना तातडीने देण्यात याव्या, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून नागपूर तसेच नजीकच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे येथे बस तसेच इतर वाहतूक विस्कळीत झालेली आहे. याच कारणामळुळे खबरदारी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रात्येक्षिकाबाबत स्थानिक स्तरावर निर्णय
ऑफलाईन (Offline) व एमसीक्यू पद्धतीने (MCQ method) विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा तीन पाळ्यात घेतल्या जात आहेत. त्या परीक्षांबाबतची सूचना दिली असली तरी काही महाविद्यालयात प्रात्येक्षिक परीक्षा सुरू असल्यास त्याबाबत महाविद्यालयानी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.