नागपूर. सावनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाला आणि पुलावरून पावसाचे पाणी वाहत आहेत. नांदा पुलावरून पाणी वाहत असतांना 6 जणांना घेऊन जाणारी स्कॉर्पिओ पाण्याच्या जोरदार प्रवाहात उलटून गेली. त्यामुळे स्कॉर्पिओ गाडीतील सर्व लोकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घटना 12 जुलै रोजी घडली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. यातील तिघांचे मृतदेह सापडली असून इतर तिघांचा शोध बचाव पथकाची टीम टीम कडून घेण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदा पुलावरून पाणी वाहत असताना स्कॉर्पिओ वाहन चालकाने पुलावरून वाहन ओलांडण्याचा प्रयत्न केला. नांदा पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत नसल्यामुळे कारचा कंट्रोल सुटलं आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात स्कॉर्पिओ वाहन वाहून गेली आणि खाली पडली. काही वेळातच कारसह त्यातील लोक पाण्यात बुडाले.
दरम्यान वाहनचालकाला रस्ता न दिसल्याने व पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने वाहन थेट पुलाच्या पाण्यात बुडाली. यावेळी स्कॉर्पिओ वाहनात 6 जण होते. या सर्वांचा शोध घेण्यासाठी प्रशासनातर्फे विविध पथके घटनास्थळी आणि आजू बाजूचा परिसरात रवाना करण्यात आले आहे, यापैकी 3 जणांचे मृतदेह सापडले. तर अन्य तिघांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी 3 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांच्या रेस्क्यू टीम तर्फे बेपत्ता 3 जणांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.
तिघांचा शोध सुरू:
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नाव व शोध सुरु असलेल्यांची नाव:
- रोशनी नरेंद्र चौकीकर (32)
- दर्श नरेंद्र चौकीकर (10)
- चालक- लीलाधर हिवरे (38)
- मधुकर पाटील (65) - रा. दातोरा
- निर्मला मधुकर पाटिल (60) - रा. दातोरा
- नीमू आठनेर (45) - रा. जामगाव जिल्हा, बैतुल, मध्य प्रदेश