Gosikhurd Flood Live 2022: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये लगातार पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी सलग सहा दिवसांपासून गोसे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोसे धरणाचे 27 दरवाजे अर्ध्या मिटरने उघडण्यात आले असून धरणामधुन पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 3000 ते 3500 क्युमेक्स पर्यंत टप्याटप्याने वाढविण्यात येईल - अशी माहिती बातमी एक्सपेसला देण्यात आली आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. तर काही भागात अतिवृष्टी झाल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. मध्यप्रदेशात देखील अतिवृष्टीने वैनगंगा नदी पाणी पात्रात वाढ झाली आहे. यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून जलसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी सलग सहा दिवसांपासून गोसे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आज धरणाचे 33 दरवाज्यांपैकी 27दरवाजे अर्ध्या मिटरने उघडण्यात आले आहे. धरणातून ३ हजार
क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने धरणाखालील भंडारा व चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी काठावरील गावांना तसेच नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.