'
30 seconds remaining
Skip Ad >

नागभीड: घोडाझरी कालव्याचा मुख्य पुलाचा काही भाग कोसळला, तुटणार इतर गावांचा कायमचा संपर्क? #BatmiExpress

0

Nagbhid,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News,Maharashtra,

वाढोणा
: नागभीड तालुक्यातील (Nagbhid taluka) अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या आणि जंगलातून धामणगाव मालला क्रास (Dhamangaon Malla Cross ) करीत जाणारा घोडाझरी तलावाच्या नवरगाव वितरिकेच्या (Navargaon Distribution ) मुख्य कालव्याचा पूल तुटण्याच्या मार्गांवर असल्याने हा पूल जर पूर्णतः कोसळला तर शेतकऱ्यांचे फार मोठी नुकसान होणार आहे. शिवाय धामणगावचा (Dhamangaon) इतर गावांशी येणारा संपर्क कायमचा तुटणार आहे. त्यामुळे वेळीच संबंधित विभागाने या महत्वाच्या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

येनोली माल ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धामणगाव माल हे गाव तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकावर अस्तित्वात आहे. आणि सभोवताल घनदाट जंगल आहे. येथूनच घोडाझरी तलावाचा नवरगाव वितरिकेचा मुख्य कालव्याचा पूल क्रास मार्गाने धामणगाव मालला गेलेला आहे. सध्यस्थितीत परिसरात पाऊस बऱ्याच स्थितीत पडत असल्याने आणि सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने सदर पूलाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे पुन्हा हा पूल कोसळण्याच्या मार्गांवर आहे. सदर पूल कोसळल्यास शेतकऱ्यांचे तर मोठी नुकसान होणार आहेच. शिवाय धामणगाव मालचा इतर गावांशी येणारा संपर्क कायमचा तुटणार आहे. येथील थोडाफार खडीकरणाचा भाग वगळता धामणगाव वासियांसाठी येनोली माल या मुख्य गावाला येण्याचा हा एकमेव डांबरी रस्ता आहे. त्यामुळे, सिंचाई विभागाने सदर पुलाची गांभीर्याने दखल घ्यावी व मार्ग सुरक्षित करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

वरिष्ठांच्या सूचनेनंतर निर्णय होईल:

धामणगाव मार्गाच्या खसलेल्या पुलाचे फोटो माझ्याप्रर्यंत आलेले आहे. ते मी वरिष्ठांकडे पाठविले आहे. त्यांच्याकडून सदर पुलाच्या दुरुस्तीबाबत सूचना आल्यास व चर्चा झाल्यानंतर तातडीने दुरुस्तीचा निर्णय घेतला जाईल.

– डी.एच.जुनोनकर, उप विभागीय अधिकारी, सिंचाई विभाग, सिंदेवाही

तर येण्या जाण्याचा मार्ग बंद पडेल:

धामणगाव माल या जंगलव्याप्त गावासाठी धामणगाव – येनोली माल हा एकमेव रस्ता आहे. याच रस्त्यावर घोडाझरी वितरिकेचा मुख्य पूल खचायला सुरुवात झाली आहे. हा पूल पूर्णतः खचला तर त्या गावाचा इतर गावाशी येण्या जाण्याचा मार्गच बंद पडेल.

– अमोल बावानकर, सरपंच, गट ग्रामपंचायत, येनोली माल, ता.नागभीड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×