वडसा: प्रेमप्रकरणातून तरुणीचा खून; कुजलेल्या स्थितीत आढळला तरुणीचा मृतदेह | #BatmiExpress

wadsa,Wadsa News,Desaiganj,crime,crime news,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Bramhapuri,murder,

murder,wadsa,crime news,Gadchiroli,Bramhapuri,Crime,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli Batmya,

वडसा : वडसा ( देसाईगंज) तालुका पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील हरदोली गावानजीक वैनगंगा नदी पुलाजवळ एका अनोळखी तरुण मुलीचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

सदर मुलगी कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुलीचा खून करून येथे टाकले असावे असा अंदाज वर्तविण्यात आलं आहे. खून करणाऱ्या सहआरोपी याला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार देसाईगंज येथीलच असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची कुणकुण लागताच तो फरार झाला आहे, अशी माहिती देसाईगंज पोलीस विभागाकडून मिळाली आहे. 

खून प्रेमप्रकरणातून घडले असल्याचेही बोलले जात आहे. मोबाईल ट्रेसवरून आरोपी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.