गडचिरोली शहरापासून, मुल रोडवर अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलखल गावात एका व्यक्तीने आपल्या जुन्या प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या पतीची हत्या केल्याची घटना आज दुपारी चार वाजता च्या सुमारास घडली.
मृतकाचे नाव कैलाश रामकृष्ण मेश्राम वय 31 वर्ष राहणार पुलखल आणि मारेकरी आरोपीचे नाव नरेश देवराव गेडेकर वय 32 वर्ष राहणार पुलखल असे असून दोघांचे मृतक कैलास मेश्राम यांच्या पत्नीच्या अवैध संबधावरून वाद झाल्याने मृतकाचे डोक्यावर पावढ्याने मारून ही हत्या केल्याची कबुली आरोपीने समर्पण करून पोलिस ठाण्यात माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार ताबडतोब पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.