![]() |
नैसर्गिक पद्धतीने रेड राइस शेतीची लागवड |
बातमी एक्सप्रेस वृत्तसेवा, ब्रह्मपुरी :
ब्रम्हपुरी: चंद्रपुर जिल्ह्यातील, ब्रम्हपुरी तालुक्यामधील एक युवा शेतकरी कु. कृणाल मनोहर येरमे यांनी पारंपारिक शेतीला आळा घालण्यास व नवीन उद्योगिक, नजरेने शेतीला बघत, एक नवीन प्रयोग आपल्या शेतावर करून बघत आहेत. पारंपारिक शेतीचा अमाप खर्च, रासायनिक खत, औषधी च वारेमाप खर्च व अंग मेहनतीला आळा घालन्याकरिता श्री. चंद्रशेखर भडसावळे S R T. शुन्य मशागत तंत्र व पद्मश्री शुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक पद्धत विचारात घेऊन S R T. भाताची लागवड केली आहे. रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी नैसर्गिक भाताची शेती तयार करण्यात येत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेऊन, शेतीला आऊँद्योगिक नजरेने विचार घेऊन रेड राइस हे भात लागवड केले आहे.
रेड राइस या भाताला चांगला भाव असून, त्याचा आरोग्यासाठी खूपच चांगला असून, त्याचा आरोग्यास अतिशय चांगला फायदा आहे . रेड राइस भात आपल इम्यूनिटी पॉवर साठी, बी. पी. शुगर ,कॉलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी आणि याचा वापर कॅन्सर रोगी साठी पण केलं जातो. आणि बाजारात या भाताला चांगला भाव पण मिळत असतो. ही एक शेतीच करणे नसून, कृणाल येरमे यांनी बातमी एक्सप्रेस सोबत बोलताना म्हटले कि, व्यावसायिक दृष्टीने हा एक प्रयोग करून बघत आहोत, आणि पुन्हा नवनवीन प्रयोग आम्ही करू आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा याविषयी जागृत करू.
भात शेती रासायनिक नसुन, हि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने करण्याचं विचार आहेत. ही अशी शेती करून शेतकरी बांधवांना व सगळ्यांना याचा फायदा व्हावा. या उद्देशाने हे एक नवीन प्रयोग मी करत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.