तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Flood Live 2022: गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, 8500 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु - #BatmiExpress

Gosikhurd Flood Live 2022,Goshikhurd,Gadchiroli Rain,Gosikhurd,Bhandara,Bhandara Live,Bhandara Batmya,Chandrapur,Bhandara Rain News,Gadchiroli,Gosikhu
Gosikhurd Flood Live 2022,Goshikhurd,Gadchiroli Rain,Gosikhurd,Bhandara,Bhandara Live,Bhandara Batmya,Chandrapur,Bhandara Rain News,Gadchiroli,Gosikhurd Flood Live,Bhandara News,

Gosikhurd Flood Live 2022: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये लगातार पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी सलग सहा दिवसांपासून गोसे धरणातून पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने  वाढविण्यात येत आहे. गोसे धरणाचे 33 दरवाजे ( Gosikhurd Dam Open 33 Gates)  उघडण्यात आले असून यापैकी 27 दरवाजे 1 मीटर ने तर उर्वरित 6 दरवाजे 1.5 मीटर ने उघडण्यात आले आहेत. या सर्व दरवाज्यातून 7797 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गोसीखुर्द धरण क्षेत्रा खालील वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. गोसीखुर्द धरणामधुन पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 8000 ते 8500 क्युमेक्स पर्यंत टप्याटप्याने वाढविण्यात येईल - अशी माहिती बातमी एक्सपेसला  देण्यात आली आहे.  (Gosikhurd Flood Live 2022 )

जिल्ह्यात काही दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. तर काही भागात अतिवृष्टी झाल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. मध्यप्रदेशात देखील अतिवृष्टीने वैनगंगा नदी पाणी पात्रात वाढ झाली आहे. यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून जलसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी सलग सहा दिवसांपासून गोसे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आज धरणाचे 33  दरवाजे घडण्यात आले असून यापैकी 27 दरवाजे 1 मीटर ने तर उर्वरित 6 दरवाजे 1.5 मीटर ने उघडण्यात आले आहेत. या सर्व दरवाज्यातून 7797 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.]

 त्यामुळे  गोसेखुर्द धरणाखालील भंडारा व चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी काठावरील गावांना तसेच नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.