गडचिरोली ( Gadchiroli Flood 2022 Imapct ) :- गडचिरोली जिल्ह्यातील अनके भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गडचिरोली ते चामोर्शी मार्ग बंद झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून रेड अलर्ट हवामान विभागाने जाहीर केल होत. त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे पावसाने थैमान घातले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघण्यात आले असून, 8598 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांची पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे.
पुरामुळे खालील मार्ग बंद :
- गडचिरोली ते चामोर्शी
- आरमोरी ते गडचिरोली
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आलेला आहे या पुरामुळे गडचिरोली ते चामोर्शी मार्ग बंद पडलेला आहे . तसेच आरमोरी ते गडचिरोली मार्ग सुद्धा पुरामुळे बंद पडलेला आहे. संबंधित ठिकाणी पोलीस विभागाने अनुचित घटना होऊ नये याकरिता पोलिसांनी बंदोबस्त तैनात केले असून, नागरिकांना पुरामध्ये जाण्यापासून अटकाव केला आहे. तरी पुराच्या पाण्यामधे कुठल्याही नागरिकांनी प्रवेश करू नये असे प्रशासनाने कळविले आहे.