तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Flood 2022: गडचिरोलीत मेडिकल कॉलेज सुरू होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांनी केली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी - #BatmiExpress

Gadchiroli Flood 2022,Gadchiroli News,Gadchiroli Rain,Gadchiroli,Gadchiroli Flood 2022,Gadchiroli live,Gadchiroli Rain 2022,Gadchiroli Heavy Rain 2022
Gadchiroli Flood 2022,Gadchiroli News,Gadchiroli Rain,Gadchiroli,Gadchiroli Flood 2022,Gadchiroli live,Gadchiroli Rain 2022,Gadchiroli Heavy Rain 2022,Gadchiroli Rain News,Gadchiroli Heavy Rain,Gadchiroli Batmya,


गडचिरोली
:- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात माेठ्या प्रमाणात पाऊस पडलं आणि आजही विविध ठिकाणी पाऊसाचा कहर सुरूच आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात मागील गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे तेथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे ) आणि उपमुख्यमंत्री ( देवेंद्र फडवणीस )  हे गडचिरोलीस रवाना झाले आहेत. 

गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाय योजनेसंदर्भात माहिती दिली.

गडचिरोली पूरस्थिती उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक:


गडचिरोलीतील पूरस्थिती (Gadchiroli Flood 2022 ) आणि प्रशासनातर्फे केल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भात एक आढावा बैठक आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासमवेत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. सविस्तर माहिती घेत, योग्य त्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
या बैठकीला खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आणि राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुराच्या व्यतिरिक्त इतरही जिल्ह्यातील समस्यांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

Gadchiroli Flood 2022,Gadchiroli News,Gadchiroli Rain,Gadchiroli,Gadchiroli Flood 2022,Gadchiroli live,Gadchiroli Rain 2022,Gadchiroli Heavy Rain 2022,Gadchiroli Rain News,Gadchiroli Heavy Rain,Gadchiroli Batmya,
उपाययोजनांसंदर्भात एक आढावा बैठक आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासमवेत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली

गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू ( Medical college will be started in Gadchiroli district ) करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे गडचिरोली जिल्ह्याला मोठा दिलासा मिळून आरोग्य व्यवस्था बळकट होईल. पुराच्या स्थितीचा संपूर्ण आढावा घेत सतर्क राहून योग्य दिशानिर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

हवामान विभागाकडून रेड अलर्ट, 3 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी :
गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. पुढील २ दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येतायत. पुढील 3 दिवस शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आलीय. तसंच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. मात्र शासकीय कार्यालयं सुरु राहणार आहेत. गडचिरोलीच्या भामरागड-आलापल्ली मार्गावरील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. त्यापैकी तुमर्गुंडा नाल्यावर पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागतोय. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पर्यायी रस्ताच वाहून गेल्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे. 

NDRF आणि SDRF च्या टीम अलर्ट:

दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना देखील मुख्यालयात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच NDRF ची टीम आणि SDRF च्या टीमला देखील सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तिथे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.