तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर पूर: इरई धरणाचे 2 दरवाजे उघडले, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - #BatmiExpress

Irai Dam News,Chandrapur Rain,Chandrapur,Chandrapur Rain 2022,Chandrapur Live,Chandrapur Flood,Irai Dam,Chandrapur Rain News,Chandrapur Flood 2022,

Irai Dam News,Chandrapur Rain,Chandrapur,Chandrapur Rain 2022,Chandrapur Live,Chandrapur Flood,Irai Dam,Chandrapur Rain News,Chandrapur Flood 2022,Floods,

चंद्रपूर
:- चंद्रपूर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे इरई धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत असून इरई धरणाचे  2 दरवाजे उघडण्यात आलं आहेत. इरई धरणातील पाण्याची पातळी सततच्या पावसाने वाढत असल्याने या धरणाचे दोन द्वार 0.25 मिटरने उघडले आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडावे लागले.

इरई नदी काठावर राहणार्‍या व परिसरातील वडगाव, हवेली गार्डन, नगिनाबाग, महसुल, सिस्टर कॉलनी, रहेमत नगर तसेच झरपट नदी लगतच्या तुळजा भवानी, महाकाली वॉर्ड, भंगाराम परिसर, सोनारी मोहल्ला, दादमहल, काजीपुरा वसाहत येथील नागरिकांनी नदीपात्रापासून दूर सुरक्षित ठिकाणी रहावे, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
महाऔष्णिीक विज केंद्राला लागून असलेल्या इरई धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाल्याने इरई नदीकाठावरील पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव (पोडे), भटाळी, वढोळी, चिचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा (बुजुर्ग), आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर शहर, माना आणि इरई नदीच्या काठावरील गावांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे.
नागरिकांना सतर्क करून पूरस्थितीपासून दूर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास इरई धरणाच्या क्षेत्रातील संभाव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाय व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रस्ते बंद करण्यात आले आहेत ,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.