तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Flood 2022 Imapct: 20 जुलै पर्यंत शाळा - महाविद्यालये व इतर सर्व बाबी राहणार बंद - जिल्हाधिकारी संजय मीना - #BatmiExpress

 Gadchiroli News,Gadchiroli Rain,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Rain 2022,Gadchiroli Rain News,Gadchiroli Batmya,

बातमी वृत्तसेवा गडचिरोली 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सतत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हयातील पुरस्थितीवर उचित नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायायोजनेअंतर्गत 11 जुलै ते 16 जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा, अस्थापना वगळता शाळा, महाविद्यालय व इतर सर्व बाबी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले होते. मात्र पुन्हा हवामान विभागाने जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट घोषविल्याने बुधवार 20 जुलै 2022 पर्यंत अत्यावश्यक सेवा, अस्थापना वगळता जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद राहणार असे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी नवे आदेश जारी करत कळविले आहे.

( Life has been disrupted in Gadchiroli district due to continuous heavy rains. In order to get a proper control over the situation in the district, the Collector had issued an order to close schools, colleges and all other matters except essential services, establishments and other matters from July 11 to July 16 under preventive measures. But again, as the Meteorological Department has declared Orange Alert for two days in the district, District Collector Sanjay Meena has issued a new order to inform that schools and colleges in the district will remain closed except for essential services and establishments till Wednesday 20 July 2022. ) 

बुधवारपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालये बंद. नुकतेच प्रादेशिक हवामान विभाग यांनी गडचिरोली जिल्हासाठी आजपासून 2 दिवस ऑरेंज अलर्ट घोषित करीत असल्याचे सुधारित फोरकास्ट या कार्यालयास पाठविले असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील सर्व शाळा/विद्यालय/महाविद्यालये हे बुधवारपर्यंत बंद ठेवण्याबाबत सदर आदेश सुधारित करण्यात येऊन पुन्हा पाठविण्यात येईल,याची कृपया नोंद घ्यावी. 

( Schools, colleges in Gadchiroli district closed till Wednesday. Please note that as the Regional Meteorological Department has recently sent a revised forecast to this office declaring orange alert for Gadchiroli district for 2 days from today, the said order regarding closure of all schools/schools/colleges in the entire district till Wednesday will be revised and sent again. )

सुधारित फोरकास्ट उत्तर: जिल्हयात 10 जुलै पासून सतत मुसळधार पावसाने येत असल्यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांमधून पाणी वाहत आहे. यामुळे अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती आताही कायमच आहे. तसेच गडचिरोली, आरमोरी या भागातही पाऊस  सतत मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्हा प्रशासनाने 11 ते 16 जुलै दरम्यान आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना बंद राहणार याबाबत आदेश निर्गमित केले होते. आता सदर आदेशाला जिल्हाधिकारी संजय मीना यांनी बुधवार 20 जुलै 2022 च्या मध्यरात्री पर्यंत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

( Revised Forecast Answer: Due to continuous heavy rains in the district since July 10, water is flowing from major rivers and small drains. Due to this, the flood situation in Aheri, Sironcha and Bhamragarh talukas is still ongoing. Also, heavy rain is continuously falling in Gadchiroli and Armori areas. The district administration had issued an order that the rest of the establishments except essential services would remain closed between July 11 and 16. Now the said order has been extended by Collector Sanjay Meena till the midnight of Wednesday 20 July 2022. ) 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेसह सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. त्यामूळे नैसर्गिक आपत्तीला टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. यामूळे प्रशासनाने निर्णय घेतला आहे की, बुधवार 20 जुलै 2022 चे 24.00 वाजेपर्यंत शासकीय, निमशासकीय व आत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीना यांनी कळविले आहे.

( The District Disaster Management Department has appealed to the citizens to take precautions without panicking. The district administration along with the police system is monitoring all the incidents. Therefore, it is necessary to cooperate with the administration to prevent natural calamities. Due to this, the administration has decided that schools and colleges will remain closed on Wednesday 20th July 2022 till 24.00 hrs except for government, semi-government and essential services. This has been informed by Collector and Chairman District Disaster Management Authority, Gadchiroli Sanjay Meena. )

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.