चंद्रपूर - मागील सात दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तर पाऊस आणि पूर आलेल्या क्षेत्रातील चांगलेच नुकसान झाले आहे. शहरातील दादमहल येथील हनुमान खिडकी लगत असलेल्या किल्याची पडझड होत आहे.
हनुमान खिडकी लगत असलेल्या किल्याची भिंत पडण्याची मोठी शक्यता असल्यामुळे जीवित हानी होऊ शकते, नागरिकांनी भिंतीचा जवळ जाण्याचे टाळावे. कृपया याची दक्षता घ्यावी. असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे.
अतिक्रमण पथक पाठवून पडझड झालेल्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे. तसेच पुरातत्व विभागाला सदर घटना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आलेले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.