ब्रम्हपुरी : तालुक्यातील लाडज हे गाव चारही बाजूने वैनगंगा नदीने वेढलेले आहे. लाडज गावाला मागील सहा दिवसांपासून पुराने वेढलेले आहे. लाडज गावाला नेहमी बेटाचे स्वरूप प्राप्त होते. गावात आरोग्य सूविधा नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ लागलं आहे.
मागील सहा दिवसांपासून लाडज ते चिखलगाव डोंगा ( बोट ) प्रवास मार्ग बंद होता. परंतु बातमी एक्सप्रेसच्या वृत्तलेखनाची दखल घेत ग्रामपंचायतने लाडज ते चिखलगाव डोंगा प्रवास आज पासून सुरु केलं आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना व विदयार्थ्यांना ये- जा करण्यास मदत होईल.
लाडज गावाचा पुरातून प्रवास कसा होतो?
- पहिला मार्ग - लाडज ते सावंगी (डोंगा प्रवास बंद )
- दुसरा मार्ग - लाडज ते चिखलगाव (डोंगा प्रवास सुरु)
- तिसरा मार्ग - लाडज ते पिंपळगाव (डोंगा प्रवास तात्पुरता सुरु )
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.