चंद्रपूर :- शेतीचे फेरफार करण्याकरिता 20 हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी राजूरा ( Rajura ) तालुक्यातील सास्ती साझ्याच्या महिला तलाठीवर ( Woman Talathi ) कारवाई करण्यात आलेली आहे. एका शेतकऱ्याने खरेदी केलेल्या शेतजमिनीची फेरफार करण्यासाठी संबंधित तलाठीकडून या लाचेची मागणी करण्यात आलेली होती. दिपाली परमानंद भडके ( Dipali Parmanand Bhadke ) असे तलाठीचे नाव असून चंद्रपूरच्या लाचलुचपत विभागाने ( Chandrapur ANTI-CORRUPTION BUREAU ) ही कारवाई केली आहे.
एकाच अठवड्यात दुसरी घटना:
आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. याच तालुक्यातील एका तलाठ्याने 25 हजाराची लाच घेतल्या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली होती. या घटनेची शाई वाळते न वाळते आज सोमवारी (25 जुलै) पुन्हा दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
Chandrapur :- An action has been taken against the woman Talathi of Sasti Sazhya in Rajura taluka in the case of asking for a bribe of 20 thousand rupees to change the agriculture. This bribe was demanded from the concerned talathi to change the agricultural land purchased by a farmer. Talathi's name is Dipali Parmanand Bhadke and this action has been taken by the bribery department of Chandrapur.
Second incident in a week
This is the second such incident in a week. Action was taken against him in the case of accepting a bribe of 25 thousand from a Talathi of the same taluka. As the ink of this incident has not yet dried, on Monday (July 25) action has been taken for the second time, there has been a stir in the revenue department.