ब्रम्हपुरी: मच्छी पकडताना वीज पडून जागीच मृत्यू - #BatmiExpress

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Bramhapuri News,Chandrapur Lightning Strike,

ब्रम्हपुरी
:   तालुक्यातील अड्याळ गावातील तलावात मच्छी पकडताना वीज पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. नारायण शिवराम कांबळी (वय 45) रा. चोरटी असे वीज पडून मृत्यू झालेल्याचे नाव व पत्ता आहे. जिल्ह्यात लगातर दोन-तीन दिवसापासून सतत पाऊस होत असल्याने नदी , नाले भर-भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात मच्छी येतात .याच आशेने मच्छी पकडायला तलावात गेले.

मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. याच दरम्यान अड्याळ गावातील तलावात मच्छी पकडत असताना सुमारे 4 च्या सुमारास मेघ गर्जनासह विजांचा कडकडाट मुसळधार पाऊस झाला आणि त्यातच मृतकावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. विज पडून मृत झाल्याची घटना माहिती होताच घटनास्थळी चोरटी गावातील ग्रामस्थ एकत्र येत घटनेची माहिती प्रशासनाला पाठवली असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतक नारायण यांच्या पश्चात परिवारात वडील, पत्नी, दोन मुले एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. मृतक हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. अशातच वीज पडून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे प्रशासनाने दुर्घटनाग्रस्त परिवारांना तात्काळ मदत मदत द्यावी अशी मागणी नागरिकात होताना समोर येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->