ब्रम्हपुरी पोलिसांनी तांत्रिक तपासात तुषार बुज्जेवार याला अटक केली तर दुसरा आरोपी संदीप पटले हा फरार होता, पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली असून या प्रकरणात दोन्ही आरोपी अटकेत आहे.
ब्रम्हपुरी - ब्रम्हपुरी येथील वैनगंगा नदीच्या पात्राजवळील हरदोली येथील पंप हाऊस मध्ये 20 वर्षीय ऐश्वर्या खोब्रागडे या युवतीचा मृतदेह मिळाला होता. विशेष बाब म्हणजे ऐश्वर्या हिचा मृत्यू 10 महिन्या पूर्वी झालं होतं .पोलीस तपासात असं समोर आलं कि, ऐश्वर्याचा पहिले डोके आपटून तिला अतिशय गंभीर जखमी करण्यात आलं नंतर गळा दाबून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
सविस्तर वृतांत: ब्रम्हपूरी पोलीस स्टेशन येथे दाखल दि. 07/07/22 रोजी कलम 302, 364, 201, 34 भादवी सह. 3(2)(v)अ.जा.अ.प्र.का. अन्वये दाखल खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस पोलीसांनी शिताफिने अटक केली. माहे ऑगस्ट 2021 पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी येथे दाखल लापता मुलगी नामे कु. ऐश्वर्या दिगंबर खोब्रागडे (20 ) हीचा मृतदेह हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाऊस येथे आढळल्याने पो.स्टे.ला कलम 302, 364, 201, 34 भादवी सह 3 ( 2 ) (v) अ.जा.अ.प्र.का. अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.ब्रम्हपुरी पोलिसांनी तांत्रिक तपासात तुषार बुज्जेवार याला अटक केली तर दुसरा आरोपी संदीप पटले हा फरार होता, पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली असून या प्रकरणात दोन्ही आरोपी अटकेत आहे.
तुषार ला अटक झाल्यावर संदीप पटले रा.वडसा हा पसार झाला होता, 10 महिन्यांपूर्वी केलेली हत्या याचा कुणाला सुगावा लागणार नाही अशी कल्पना त्याला होती, मात्र ऐश्वर्या चा मृतदेह मिळाल्यावर तो पसार झाला, पोलिसांच्या पथकाने त्याला वडसा हद्दीत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुला खालून अटक करण्यात आली, संदीप ची कसून चौकशी केल्यावर त्याने ऐश्वर्या चा खून केला असल्याची कबुली दिली.
पोलीस तपासात पोलिसांना आश्चर्यचकित बाब करणारी माहिती समोर आली, आरोपी संदीप पटले याच्यावर अनके गुन्हे दाखल होते:
- वडसा पोलीस ठाण्यात 2018 ला हत्येचा गुन्हा दाखल
- गोंदिया पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
आरोपी संदीप हा अतिशय रागिष्ट स्वभावाचा आहे.
सदरचा यशस्वी तपास अरविंद साळवे पोलीस अधिक्षक, जि . चंद्रपूर, मल्लिकार्जून इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, अतिरीक्त कार्यभार ब्रम्हपूरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव, सपोनी प्रशांत ठवरे, पोउपनी सुरेंद्र उपरे पोहवा / अंकूश आत्राम, नापो / सचिन बारसागडे, मुकेश गजबे, योगेश शिवनकर, पोशी / विजय मैंद, संदेश देवगडे, अजय कटाईत व पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीमधील स्टॉफ यांनी ही कामगीरी केली . सदर गुन्हयाचा तपास मल्लिकार्जून इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, अति कार्य ब्रम्हपूरी हे करीत आहेत.