'
30 seconds remaining
Skip Ad >

ट्रॅक्टर कालव्यात उलटला आणि घेतला पेट, दोघांचा झाला जागीच कोळसा - Be Media

0

Tumsar,Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Live,Bhandara News,Bhandara Marathi News,Bhandara Today,

तुमसर:
- शेतातील आपले काम करून शेतावरून परत जात असताना अचानक ट्रॅक्टर कालव्यात उलटला. काही क्षणात ट्रॅक्टरने पेट घेतल्याने ट्रॅक्टरवरील चालक आणि शेतकर्‍याचा जळून कोळसा झाल्याची दुर्दैवी घटना तुमसर तालुक्यातील आसलपाणी येथे मंगळवार, १४ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. 

मृतकाची नावे खालील प्रमाणे: 

दिनेश मदनलाल गोपाल (२७) रा. आसलपाणी असे शेतमालकाचे नाव तर अर्जुन रामभजन रहांगडाले (३२) रा. भोंडकी अशी मृतांची नावे आहेत.

दिनेश आणि अर्जुन हे दोघेही मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतात पेरणीसाठी गेले होते. दुपारी २ च्या सुमारास गावाकडे परत जात असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने शेतशिवारालगत असलेल्या कालव्यात ट्रॅक्टर उलटले. त्यामुळे दोघेही ट्रॅक्टरमध्ये अडकून पडले. त्यानंतर काही क्षणात ट्रॅक्टरला आग लागली. दोघेही अडकून पडल्याने ते बाहेर निघू शकले नाही आणि आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. थोड्या वेळात दोघांचाही कोळसा झाला. घटनास्थळी दोघांचे हाडं तेवढे दिसत होते. घटनास्थळी गावकर्‍यांची मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी गोबरवाही पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×