मुंबई : मागील काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol diesel price) दरात वाढ होताना दिसत आहे. याला परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाचे वाढलेले भाव (International oil price hike) तसेच रशिया युक्रेन (Russia Ukraine) या दोन देशातील होत असलेलं युद्ध याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीत (Petrol diesel price) झाला आहे. तेल कंपन्यांकडून पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी (Oil Company Petrol diesel price issue) करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने मागील महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे. (The central government last month cut petrol and diesel prices) पेट्रोलची किंमत ९ रुपयांनी तर डिझेलमध्ये ७ रुपयांची घट झाली होती. तेल कंपन्यांनी आज इंधन दरात कोणताही बदल (Petrol diesel price no change) केला नाही.
काय आहेत आजचे पेट्रोल-डिझेलचे दर?
केंद्र सरकारने २१ मे २०२२ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील अबकारी कर कमी केला होता. (Excise duty on petrol and diesel rates) सरकारच्या निर्णय़ामुळे पेट्रोलच्या दरात ८ तर डिझेलच्या दरात ६ रुपये अबकारी कर माफ केला होता. देशात पेट्रोलियम कंपन्यांनी नवे दर जारी केले आहेत. यानुसार मुंबईत पेट्रोल ११.३५ तर डिझेल ९७.२८ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०६.०३ तर डिझेलची किंमत ९२.७६ रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा प्रति लीटर भाव ९६.७२ रुपये आहे. तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर मिळत आहे.
राज्यातील प्रमुख शहरांपैकी मुंबईच्या तुलनेत नागपूरमध्ये पेट्रोलचा दर जास्त आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचा भाव १११.४१ रुपये आहे. तर डिझेलचा भाव ९५. ७३ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये १११.०२ आणि डिझेलचा दर ९५.५४ रुपये आहे. पुण्यात पेट्रोल १११.३० रुपये तर डिझेल ९८ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १११.२५ तर डिझेल ९५.७३ रुपये आहे.