Maharashtra SSC 10th Result 2022: इयत्ता 10वीचा निकाल उद्या 17 जूनला ऑनलाइन जाहीर; शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती; कुठे, कधी आणि कसा बघाल? जाणून घ्या एका क्लिक वर - | Be Media

Maharashtra SSC Result 2022,SSC 2022 Exam,SSC 2022 Exam News,Education,Maharashtra SSC 10th Result 2022,SSC 2022,SSC Result 2022,10वीचा निकाल

 

Maharashtra SSC Result 2022,SSC 2022 Exam,SSC 2022 Exam News,Education,Maharashtra SSC 10th Result 2022,SSC 2022,SSC Result 2022,10वीचा निकाल
दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल. ( Maharashtra SSC 10th Result 2022 )

Maharashtra SSC 10th Result 2022:  दहावी बोर्डाचा निकाल उद्या (१७ जून) जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन आपला निकाल पाहता येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. Maharashtra SSC 10th Result 2022 )

Maharashtra SSC 10th Result 2022: तारीख आणि वेळ

महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 10वीचा 2022 निकाल आज 17 जून 2022 रोजी दुपारी 1:00 वाजता होणार आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील वेबसाइटवर दुपारी १ नंतर पाहता येणार आहे. 

Maharashtra SSC 10th Result 2022 - 10वीचा निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट:

Maharashtra SSC 10th Result 202210वीचा निकाल कसा तपासायचा:

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2022 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.