पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून एकाने महिलेचा साडेतीन वर्षे बलात्कार करून दोन वर्षांचा मुलगा असूनही दुसऱ्या महिलेशी लग्न केले. याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राकेश हिवारे (वय 33 वर्षे, रा. भोसरी) त्याचे नाव असून तो मूळ कर्नाटक राज्याचा रहिवासी आहे.
आरोपीने जुलै 2018 ते जानेवारी 2022 पर्यंत लग्नाचे अमिष दाखवून फिर्यादीची इच्छा नसताना जबरदस्तीने वेळोवेळी त्यांच्याशी शारीरिक संबंध केले. त्यानंतर आरोपीपासून फिर्यादी गरोदर राहिली. व त्यानंतर 20 फेब्रुरी 2020 ला प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला. फिर्यादीने त्यास वेळोवेळी लग्न करण्याबाबत विचारले असता अरोपीने त्यांच्याशी लग्न केले नाही.
त्यानंतर आरोपी त्याच्या मूळ गावी कर्नाटक येथे जाऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे. अशा प्रकारे आरोपी याने फिर्यादीस लग्नाचे अमिष दाखवून त्यांच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध करून बलात्कार केला आहे. आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.