मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सध्या महारष्ट्राचं अख्ख राजकारण हादरलंय. मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निधून गेल्याने शिवसेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत.
दरम्यान अशातच सुत्राच्या माहितीनुसार एक मोठी मोठी घडामोड समोर आली आहे. काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे इंदूरमार्गे बडोद्याला रवाना झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे हेदेखील काल गुवाहाटीवरुन बडोद्याल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. येथे त्यांची भेट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावेळी त्यांनी पुढील प्लान रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या भेटीबाबत कोणतीही पुष्टी मिळाली नसली तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच कारणासाठी दोघे बडोद्याला जाण्याची शक्यता दाट आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे परतीच्या वेळेसही ते आधी इंदूरला आले आणि येथून मुंबईल परतले. महाराष्ट्रातील एअरपोर्ट शिवसेनेच्या ताब्यात असल्या कारणाने फडणवीसांना आपली यात्रा गोपनीय ठेवली आणि इंदूरला येऊन गुजरातला गेले. त्यांच्या या प्रवासादरम्यान दोन्हीही वेळेस कोणी विमानातून उतरलं नाही आणि चढलंदेखील नाही. विमानात केवळ इंधन भरण्यात आलं. मुंबईपासून वडोदरा अवघ्या 400 किलोमीटरवर आहे. आणि मुंबईहून इंदूर 600 किलोमीरटर. अशात मुंबईहून थेट वडोदरा जाण्याऐवजी फडणवीस इंदूरच्या मार्गाने येथे का गेले? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आपली गुजरात दौरा लपवण्यासाठी ते व्हायाला इंदूरहून गेले.
काल 24 जून रोजी सायंकाळी त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना वाटलं की, फडणवीसांसोबत इंदूरहून कोणी जाईल किंवा परत येईल. मात्र दोन्ही वेळेस विमानात दुसरं कोणीच चढलं वा उतरलं नाही. अधिकाऱ्यांनाही कळालं नाही की, जर त्यांना वडोदऱ्याला जायचं होतं, तर इंदूरला का आले. कारण मुंबई ते वडोदरा हवाई मार्गाने सरळ आहे. तर इंदूर दुसऱ्या दिशेला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.